कोलकत्ता येथे डॉक्टर वर झालेले अमानुष अत्याचार आणि हत्या यामुळे संपूर्ण देश हादरला आहे . याचे पडसाद सर्वत्र बघायला मिळत आहेत दरम्यान , आता या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे .ट्रेनी महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयला अटक करण्यात आली आहे.
आरोपी संजय रॉय याने गुन्हा कबुल केला होता. मात्र, आता त्याने सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. तुरुंगाच्या सुरक्षा रक्षकांना संजय रॉय याने वेगळीच कहाणी सांगितली आहे. त्यामुळं या प्रकरणातील गुंता अधिकच वाढत असल्याचे समोर येत आहे.
कोलकाता प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं आहे. सीबीआय या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयची रविवारी पॉलीग्राफ टेस्ट करणार आहे. खोट पकडणाऱ्या या टेस्टच्या आधीच आरोपी संजय रॉयने हत्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच, त्याला यात अडकवण्यात येतंय मी निर्दोष आहे, असा दावा केला आहे.
तुरुंग अधिकाऱ्यांच्या हवाल्यानुसार, एका रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलं आहे की, संजय रॉयने तुरुंगातील गार्डना सांगितलं आहे की त्याला रेप आण हत्या प्रकरणाबाबत काहीच माहिती नाही. कोलकत्ता पोलिसांच्या म्हणण्यानुसार संजय रॉयने सरकारी आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये प्रशिक्षित महिला डॉक्टरवर बलात्कार व हत्या करण्याचा गुन्हा आरोपीन कबुल केला होता. तसंच, शुक्रवारी आरोपीने अतिरिक्त मुख्य न्यायिक मजिस्ट्रेट कोर्टासमोर बेकसुर असल्याचा दावा केला होता. आरोपीने जजसमोर म्हटलं होतं की, बेकसुर असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्याने पॉलीग्राफ टेस्टसाठी देखील मंजुरी दिली होती.