नोकरी जॉईन केली अन 4 महिन्यातच  तरूणीचा मृत्यू, आईने केला खळबळजनक खुलासा
नोकरी जॉईन केली अन 4 महिन्यातच तरूणीचा मृत्यू, आईने केला खळबळजनक खुलासा
img
दैनिक भ्रमर
नोकरी जॉईन केल्यानंतर अवघ्या 4 महिन्यात तरूणीचा मृत्यू  झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.  एना सेबेस्टियन पिरेयिल असं मृत तरूणीचं नाव आहे. एनाच्या आईने आपल्या लेकीच्या मृत्यूला तिच्या कंपनीला जबाबदार धरले आहे .एना पुण्यातील अन्स्ट अँड यंग या कंपनीच्या एका फर्म मध्ये   चार्टर्ड अकाउंटंट होती.

 एनाच्या आईने कंपनीचे प्रमुख राजीव मेमानी यांना पत्र लिहिलंय. ज्यात म्हटलं की, एनाने कंपनी जॉइन केल्यानंतर ती नेहमीच कामाच्या तणावाखाली रहायची. एनाने मार्च 2024 मध्ये कंपनी जॉइन केली होती. 6 जुलै रोजी पुण्यात सीए दीक्षांत समारंभामध्ये माझी मुलगी सहभागी होण्यासाठी पतीसोबत गेली होती. त्याठिकाणी अचानक तिच्या छातीमध्ये दुखू लागले. त्यानंतर तिला डॉक्टरकडे नेण्यात आले. मात्र, 20 जुलै रोजी मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी समजली. कामाचा ताण  असल्याने तिचा मृत्यू झाल्याचे आईने  म्हंटले आहे.

एनाच्या आईने पुढे म्हटलं की, 'पहिलीच नोकरी असल्यानं एनाने स्व:ताला कामात वाहून घेतले होते. कंपनीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ती खूप काम करायची. परिणामी तिला शारीरिक, मानसिक आणि भावनिक ताण सहन करावा लागला . विषेश म्हणजे त्या बदल्यात कंपनीकडून कोणतीच चांगली वागणूक तिला मिळाली नाही'. एका घटनेचाही उल्लेख एनाच्या आईने पत्रात केला आहे. 'एकदा तिला असिस्टंट मॅनेजरने रात्री कॉल केला आणि काम दिलं. सकाळपर्यंत पूर्ण व्हायला हवं होतं असं त्याने तिला सांगितले. त्यावर तिने विश्रांतीसाठी वेळ मागितला. तेव्हा तिला उत्तरात तू रात्री काम कर, आम्हीही हेच करतो'. असे सांगण्यात आले.

कामाच्या ठिकाणी असलेल्या तणावाबाबत त्या म्हणाल्या की, 'कामावरून एना खूप थकून घरी यायची. अनेकदा कपडे न बदलताच थेट झोपून जायची. तिच्याकडे रिपोर्टसाठी मेसेजेस यायचे. तिला कामाची आवड होती. ती सहज हार मानायची नाही. अनेकवेळी तिला ही नोकरी सोडून दुसरी शोधण्यास सांगितले', असं एनाच्या आईने म्हटलंय.

इतर बातम्या
Join Whatsapp Group