तिरुपती मंदिराच्या  प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी पाम तेल आणि प्राण्यांचा चरबीचा वापर ?  काय म्हणाले मुख्यमंत्री ?
तिरुपती मंदिराच्या प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी पाम तेल आणि प्राण्यांचा चरबीचा वापर ? काय म्हणाले मुख्यमंत्री ?
img
दैनिक भ्रमर
जगप्रसिद्ध तिरुपति मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये दर्जाहिन पदार्थ आणि प्राण्यांच्या चरबीचा वापर केला होता, असा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी राज्यातील आधीच्या जगन मोहन यांच्या वायएसआरसीपी सरकारवर   केला. जनतांत्रिक गठबंधन (राजग) आमदारांच्या बैठकीला संबोधित करताना ते बोलत होते. तिरुमला लाडूदेखील दर्जाहिन सामग्रीपासून बनवण्यात आला होता. त्यांनी तुपाऐवजी जनावरांच्या चरबीचा वापर केला होता. 

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मागील जगन मोहन सरकारवर तिरुपती मंदिरात प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी बीफ टॅलो, फिश ऑईल, पाम ऑइल आणि प्राण्यांची चरबीचा वापर केल्याचा आरोप केला आहे. चंद्राबाबू यांनी बुधवारी (18 सप्टेंबर) सांगितले की, गेल्या 5 वर्षांत वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला कलंक लावला आहे. त्यांनी 'अन्नदानम' (मोफत जेवण) च्या गुणवत्तेशी तडजोड केली. 

तसेच , तिरुमलाच्या पवित्र लाडूमध्येही तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली जात असे. मात्र, आता प्रसादात शुद्ध तूप वापरत आहोत. आम्ही तिरुमला तिरुपती देवस्थानम  च्या पावित्र्याचे रक्षण करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहोत, असे ते म्हणाले. एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत संबोधित करताना नायडू यांनी दावा केला की, तिरुमला येथे निकृष्ट घटकांनी लाडू बनवले जातात.


इतर बातम्या
Join Whatsapp Group