कामाच्या स्ट्रेसमुळे तरुणीचा मृत्यू, आईचे कंपनीवर गंभीर आरोप, कंपनीने दिले हे
कामाच्या स्ट्रेसमुळे तरुणीचा मृत्यू, आईचे कंपनीवर गंभीर आरोप, कंपनीने दिले हे" स्पष्टीकरण
img
दैनिक भ्रमर
बदलत्या जीवनशैलीत आपल्या कामाच्या लोडचा आपल्या मानसिक आरोग्यावर सर्वात वाईट परिणाम झाला आहे. कामाशी संबंधित ताणतणावाचा आपल्या एकूण आरोग्यावर परिणाम होतो. काही वेळा तो इतका गंभीर होतो की त्यामुळे नैराश्यासारख्या आजारांचा धोकाही वाढतो. आजकालतर अनेक कंपन्यांमध्ये कामाचा ताण कर्मचाऱ्यांवर इतका असतो की सुट्टीच्या दिवशीही ते कामात व्यस्त असलेले पाहायला मिळतात.   अशीच एक घटना पुण्यात घडली असून ऑफीस कामाच्या तणावामुळे माझ्या मुलीचा जीव गेला, असं भावनिक पत्र मुलीच्या आई कंपनीला लिहीतले आहे .  त्यावर कंपनीनं एक स्टेटमेंट जाहीर केलंय. तरुण कर्मचाऱ्याचा मृत्यू हे कंपनीसाठी कधीही भरून न निघणारं नुकसान असल्याचं कंपनीनं म्हटलंय.

 पुण्यातल्या एका 26 वर्षीय महिला कर्मचाऱ्याचा जुलै महिन्यात मृत्यू झाला. अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) या जगातल्या नामांकित अकाउंटिंग कंपनीमध्ये ती काम करत होती. आपल्या मुलीचा मृत्यू कामाच्या अति तणावामुळे झाल्याचा आरोप तिच्या आईनं कंपनीला पाठवलेल्या ई-मेलमध्ये केला होता. त्यावर कंपनीनं एक स्टेटमेंट जाहीर केलंय. तरुण कर्मचाऱ्याचा मृत्यू हे कंपनीसाठी कधीही भरून न निघणारं नुकसान असल्याचं कंपनीनं म्हटलंय.

अ‍ॅना सेबॅस्टियन पेराईल या 26 वर्षीय महिला कर्मचाऱ्याचा 20 जुलै रोजी मृत्यू झाला होता. हा मृत्यू कामाच्या तणावामुळे झाल्याचं तिची आई अनिता ऑगस्टाइन यांनी अर्न्स्ट अँड यंग कंपनीचे भारतातले प्रमुख राजीव मेमाणी यांना ई-मेलद्वारे कळवलं होतं. अ‍ॅना ही केरळमधली चार्टर्ड अकाउंटंट होती. ईवाय कंपनीच्या एस. आर. बाटलीबोई ऑडिट टीममध्ये ती काम करत होती

अ‍ॅनाच्या मृत्यूबाबत ईवाय कंपनीनं नुकतंच एक स्टेंटमेंट जाहीर करून दुःख व्यक्त केलंय. हे कंपनीसाठी कधीही भरून न निघणारं नुकसान असल्याचं कंपनीनं म्हटलंय. या कठीण काळात तिच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत केल्याचं कंपनीनं म्हटलंय.  “या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबाचं झालेलं नुकसान कशानेही भरून निघणार नाही; मात्र कंपनीनं नेहमीप्रमाणे अशा कठीण काळात कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना संपूर्ण मदत केली आहे व याहीपुढे कंपनी ही मदत देत राहील. अतिशय तरुण वयात अ‍ॅनाच्या मृत्यूमुळे कंपनीलाही खूप दुःख झालं आहे. तिच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,” असं कंपनीनं स्टेटमेंटमध्ये म्हटलंय.

अ‍ॅना 18 मार्च 2024 रोजी ईवाय ग्लोबल कंपनीत दाखल झाली होती. ईवाय कंपनीच्या एस. आर. बाटलीबोई ऑडिट टीमची ती गेल्या चार महिन्यांपासून सदस्य होती. ईवाय ग्लोबल या अकाउंटिंग कंपनीचं लंडनमध्ये मुख्यालय आहे. कामाच्या तणावाबाबतही कंपनीनं स्टेटमेंटमध्ये खुलासा करून कामाच्या वातावरणात सुधारणा करून हेल्दी वातावरण तयार करण्याबाबत संकेत दिले आहेत. कुटुंबीयांचा पत्रव्यवहार आम्ही गांभीर्यानं व नम्रपणे स्वीकारत आहोत. सर्व कर्मचाऱ्यांचं कल्याण हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. भारतातल्या ईवाय कंपन्यांमधल्या सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांना कामासाठी योग्य वातावरण देण्याकरिता आम्ही प्रयत्नशील राहू, असं कंपनीनं म्हटलंय.

इतर बातम्या
Join Whatsapp Group