तिरुपती मंदिरातील लाडूच्या प्रसादात वापरण्यात येणारे तूप आणि इतर पदार्थांमध्ये प्राण्यांची चरबीचा वापर करण्यात आला आहे. असा आरोप मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता तसेच , प्रसादाची तपासनी प्रयोगशाळेत केली असता प्रसादात प्राण्यांच्या चरबीचे अंश आढळून आल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाने दावा केला आहे.
दरम्यान , या सर्व प्रकरणानंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील सर्वच मंदिरांमध्ये लवकरच स्वच्छता प्रक्रिया केली जाईल, असे म्हटले आहे. तिरुपती लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा आरोप झाल्यानंतर देशातील जागृत देवस्थानात नागरिकांच्या भावनांशी खेळ होत असल्याचा आरोप होत आहे. त्यावर शनिवारी चंद्राबाबू नायडू यांनी मंदिरांमध्ये स्वच्छता प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे सांगितले.