रेल्वेच्या एसी बोगीत आढळला साप; प्रवाशांची धावपळ
रेल्वेच्या एसी बोगीत आढळला साप; प्रवाशांची धावपळ
img
दैनिक भ्रमर
जबलपूर-मुंबई गरीब रथ एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्यांपैकी एका डब्यात साप दिसल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. एका व्हायरल व्हिडिओमध्ये हा साप ट्रेनच्या एका डब्याच्या हँडलवर फिरताना दिसत होता.

प्रवाशांना साप दिसताच संपूर्ण ट्रेनमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. ट्रेन जबलपूरहून मुंबईला जात असताना G3 कोचच्या वरच्या बंकवर (23) साप दिसला.

रेल्वे कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेत लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी वेगाने हालचाल केली. साप दिसल्यावर प्रवाशांना दुसऱ्या डब्यात हलवण्यात आले. नंतर, साप असलेला डबा वेगळा करून ट्रेन जबलपूरला परत गेली.

पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हर्षित श्रीवास्तव यांनी सांगितले की, या समस्येचा अहवाल देण्यात आला असून त्याची तपासणी केली जाईल. प्रवाशांच्या सुरक्षेला आमचे मुख्य प्राधान्य आहे आणि रेल्वे अशा समस्या गांभीर्याने घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group