स्पेनमध्ये होणाऱ्या होमिओपॅथीच्या जागतिक परिषदेत नाशिकचे
स्पेनमध्ये होणाऱ्या होमिओपॅथीच्या जागतिक परिषदेत नाशिकचे "हे" तीन डॉक्टर सादरीकरण करणार
img
दैनिक भ्रमर
नाशिक :- स्पेनमध्ये होणाऱ्या जागतिक होमिओपॅथी परिषदेत नाशिकमधील प्रसिद्ध होमिओपॅथीतज्ज्ञ डॉ. आशर शेख, डॉ. सारंग रहाळकर व डॉ. योगेश होनराव सहभागी होणार आहेत. त्यात डॉ. आशर शेख हे पोस्टर प्रेझेंटेशन करणार असून डॉ. रहाळकर व डॉ. होनराव हे रुग्णांच्या क्लिष्ट आजारावर केलेल्या उपचारांवर प्रेझेंटेशन देणार आहेत. ‘लिगा मेडिकोरम होमिओपॅथिका इंटरनॅशनल’ या संस्थेतर्फे येत्या २ ते ५ ऑक्टोबर दरम्यान स्पेन मधील सेविल शहरात ही परिषद होणार आहे.

डॉ. सारंग रहाळकर यांनी, एका रुग्णाला झालेला रक्ताचा कर्करोग आणि प्लीहेची मोठी वाढ यामुळे निर्माण झालेल्या समस्येचे निवारण होमिओपॅथीच्या औषधाने केले आहे. यात सर्व आतडे एका बाजूला दाबले गेले होते. मात्र, त्यांच्या उपचारानंतर रुग्णाच्या पोटातील गाठीही नाहिशा झाल्या. स्पेनच्या परिषदेत डॉ. रहाळकर या उपचाराची माहिती सादर करणार आहेत.

खांद्याजवळील रक्तवाहिनी ब्लॉक झाल्यामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीच्या दुर्मिळ आजारावर डॉ. होनराव यांनी यशस्वी उपचार केले. तर महिलांच्या गर्भाशयातील पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोमवर डॉ. आशर यांनी उपचार केले. तिघे स्पेनच्या परिषदेत विशिष्ट व्याधीवरील केलेली यशस्वी उपचार पद्धत सादर करणार आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group