विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात अनेक घडामोडि घडत आहेत. दरम्यान , आता आदिवासी व धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा तापत असल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी समाजाच्या प्रश्नावरुन व आरक्षणाच्याच्या मुद्द्यावर चक्क मंत्रालयातील जाळीवर उड्या घेतल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.
यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विटरवर पोस्ट करत झिरवाळ यांना चांगलंच सुनावलं होतं. तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?, असे म्हणत जाळी नसलेल्या इमारतीवरुन उडी घेण्याचा सल्ला देखील दिला होता. आता, त्यावरुन नरहरी झिरवाळ यांनी पलटवार केला आहे.
नरहरी झिरवळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर पलटवार करत अप्रत्ययक्षपणे चॅलेंज दिले आहे. “मी जाळी नसलेल्या ठिकाणी सुद्धा उडी मारू शकतो. मी आदिवासी आहे. जाळीवर उडी मारणाऱ्यांना कोणी सर्कस म्हणो किंवा तमाशा म्हणो पण माझ्या आदिवासी बांधवांना न्याय मिळाला. ज्यांना प्रयोग करायचा असेल त्यांनी अजून डबल जाळी लावून उडी मारावी”, असं अप्रत्यक्ष आव्हान नरहरी झिरवळ यांनी राज ठाकरे यांना दिलं.