जरांगे पाटलांच्या सभेसाठी नाशिकमधून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव रवाना
जरांगे पाटलांच्या सभेसाठी नाशिकमधून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव रवाना
img
Dipali Ghadwaje
नाशिक (तेजश्री उखाडे) :- मराठा समाज आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांची आज (दि.१४) रोजी मराठा आरक्षण संदर्भात विराट ऐतिहासिक सभा अंतरवाली-सराटी ता.अंबड,जि.जालना या ठिकाणी दुपारी १:०० वाजता होणार आहे.या  सकल मराठा समाज आरक्षण मिळविण्यासाठीच्या ऐतिहासिक सभेला नाशिक शहर व जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव-महिला,युवक युवती रवाना झाले आहेत.

मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळवण्यासाठी गेल्या महिन्यापासून सकल मराठा समाजाचे आरक्षण लढाई योद्धा मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी ता.अंबड जि जालना याठिकाणी आमरण उपोषण सुरू केले होते.यावेळी मराठा समाज उपोषणकर्त्यांवर अमानुषपणे जोरदार लाठी हल्ला केल्याने लहान मुलांसह वयोवृद्ध गंभीर जखमी झाले आहे.यामुळे राज्यात मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली होती. म्हणून सरकारचा निषेध करण्यात आला आहे.तर यानुसार राज्यात राज्यात विविध ठिकाणी जाहीर निषेध करून आंदोलन करण्यात आले.

याशिवाय विविध ठिकाणी रास्ता रोको बरोबरच एक दिवस बंद पाळण्यात आला होता.हे मोठ्या प्रमाणात आंदोलन लक्षात घेऊन सरकारच्या वतीने वतीने मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी तसेच सर्व मंत्री महोदय यांचे लक्ष वेधून घेतले होते.अशावेळी सरकारकडून उपोषण मागे घेण्यासाठी प्रयत्न केले गेले आहे. परंतू मराठा समाज आरक्षणासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार ते मान्य नाही.पुढे जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी एक महिनाभर म्हणजेच आज शनिवार (दि १४) पर्यंत व पुढे अधिक दहा दिवस वेळ दिला आहे.परंतू आजपर्यंत सरकारने मराठा समाज आरक्षण संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही.त्यामुळे आज (दि.१४ ऑक्टोबर २०२३) रोजी अंतरवाली सराटी ता. अंबड, जि.जालना याठिकाणी सरकारला आरक्षण संदर्भात मराठा समाज आरक्षणासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची ऐतिहासिक सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान,सरकारला निर्णय घेण्याची मुदत संपुष्टात आली आहे. तरीही कोणताही निर्णय घेतला गेला नाही सरकारने एक महिन्यात आरक्षण देण्याचे ठोस अभिवचन दिले होते.सरकारने वेळ मागितली होती. त्याप्रमाणे मराठा समाज आरक्षणासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मान्य करीत सरकारला अवधी दिला दिला होता.त्याची मुदत त्याची मदत आज १४ ऑक्टोबर २०२३ रोजी संपली आहे.अशावेळी सरकारने आश्वासन पाळले नाही.म्हणून मराठा समाज पुन्हा आंदोलन करणार असल्याचे मनोज रंगे पाटील यांनी घोषित केले आहे. तरीही पुढील दहा दिवस अधिक वेळ सरकारला निर्णय घेण्यासाठी देण्यात आले आहे.  

 मराठा समाज आरक्षणासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी  साखळी उपोषण दरम्यान संपूर्ण राज्यात प्रमुख जिल्ह्यांमध्ये फिरून व प्रत्यक्ष भेट देऊन पुन्हा आंतरवाली सराटी येथे उपोषण ठिकाणी जाऊन पोहोचले आहे.आजपर्यंत सकल मराठा आरक्षण संदर्भात सरकारने कुठलाही ठोस निर्णय दिलेला नाही म्हणून अंतरवाली सराटी, जालना येथे आज शनिवार (दि.१४) रोजी सकल मराठा समाज आरक्षणासाठी ऐतिहासिक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील ऐतिहासिक सभेत काय..काय बोलणार..? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.या सभेसाठी संपूर्ण राज्यभरातून व राज्य बाहेर ठिकाणी सकल मराठा समाज बांधव लाखांपेक्षा अधिक संख्येने सभेसाठी दाखल झाले आहे..रवाना झाले आहेत. सभेसाठी सहभागी झाली आहे आज या सभेस राज्याच्या कानाकोपऱ्यातून किमान २५ ते ३० लाखांच्या संख्येत मराठा समाज उपस्थित झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्या दृष्टीनेच आज (दि.१४) रोजी अंतरवाली- जालना येथे होणाऱ्या या सकल मराठा समाज या ऐतिहासिक महत्त्वपूर्ण सभेकडे संपूर्ण राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या अंतरवाली सराटी या परासरातील शिवारात सुमारे ३०० एकरावर ऐतिहासिक सभा होणार आहे.

यामध्ये तब्बल १५० एकरात थेट सभा होणार असून १५० एकरावर राज्यभरातून येणाऱ्या सकल मराठा समाज बांधवांच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे या सभेसाठी तब्बल दहा हजारहून अधिक स्वयंसेवक गेल्या पंधरा दिवसापासून २४ तास नियोजन करीत आहेत.या ठिकाणी स्मरण २०० स्वीकार आणि २५ एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे.सभेच्या ठिकाणी समाज बांधवांच्या आरोग्यासाठी दहा आरोग्य कॅम्प उभारण्यात आले असून प्रत्येक ठिकाणी विस डॉक्टरांची टीम असे एकूण २०० डॉक्टर व तसेच आरोग्य पथक उपलब्ध केले आहेत.सभेच्या ठिकाणी प्रामुख्याने महिला व पुरुषांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तर ऐतिहासिक सभा सुरळीत होण्यासाठी सर्वत्र समाज बांधव स्वयंसेवक तसेच महाराष्ट्र पोलीस हे नियंत्रण ठेवून आहे.येणाऱ्या समाज बांधवांसाठी पिण्याचे पाणी,भोजन व्यवस्था यासह आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. 

दरम्यान,या ऐतिहासिक सभेसाठी अंतरवाली सराटी तालुका अंबेड जालना या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आयोजित ऐतिहासिक सभेसाठी नाशिक शहर व जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव काल रात्री रवाना झाले आहेत.नाशिक शहर जिल्ह्यासाठी मराठा समाजाचे सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा शिवतीर्थ या ठिकाणी साखळी उपोषण सुरु आहे.

या ठिकाणी तब्बल एक महिन्यापासून मराठा समाज आरक्षणासाठी उपोषण करणारे नानासाहेब बच्छाव,नितीन रोटे पाटील,चंद्रकांत बनकर,संदीप खोटे पाटील,अजित नाले,शेखर पगार,शरद लबडे,ज्ञानेश्वर कवडे,विकी गायधनी,भास्कर पाटील,राम निकम,विकी देशमुख,गणेश पाटील,संदीप बरे,विशाल निकम,संजय देशमुख,विशाल वडघुले,महिला प्रतिनिधी उपोषणकर्ते सौ.रोहिणी उखाडे,सौ.माधवी पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा बांधव काल रात्री अंतरवाल सराटी,जालना येथे रवाना झाले आहेत. सर्व आज सकाळी अंतरवेली सराटा तालुका अंबड येथील ऐतिहासिक सभेच्या ठिकाणी उपस्थित झाले आहेत.अशी माहिती नाशिक शहर जिल्हा मराठा आरक्षण उपोषण करते नाना बच्छाव राम खुर्दळ यांनी दिली. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group