ड्रग्ज प्रकरणातील संशयित वकील प्रज्ञा कांबळेला पुणे पोलिसांनी आणले नाशिकरोडच्या घरी; सुमारे अडीच तास चालली चौकशी
ड्रग्ज प्रकरणातील संशयित वकील प्रज्ञा कांबळेला पुणे पोलिसांनी आणले नाशिकरोडच्या घरी; सुमारे अडीच तास चालली चौकशी
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (प्रतिनिधी):- ड्रग्ज माफिया ललित पाटील (पानपाटील) ची मैत्रणी व ड्रग्जचा कारखाना चालवण्यात मदत करणारी वकील प्रज्ञा कांबळे हिला चौकशीसाठी पुणे पोलिसांनी आज दुपारी नाशिकरोड येथील तिच्या घरी आणले होते.

सुमारे अडीच तास तिची कसून चौकशी केल्याचे समजते. ड्रग्ज प्रकरणी नाशिकरोडचे नाव जगाच्या नकाशावर झळकले. मुंबई पोलिसांनी नाशिकरोड जवळील शिंदेगाव येथील एक कारखाना उध्वस्त करीत सुमारे तीनशे कोटींचे अंमली पदार्थ हस्तगत केले होते. त्यानंतर नाशिकरोड पोलिसांनी पहिल्या कारखाना जवळच असलेला दुसरा कारखाना शोधून नेस्तनाबूत करीत सहा कोटींचे ड्रग्ज पकडला.

त्यानंतर अनेक ठिकाणी करोडो रुपयांचा ड्रग्ज शोधून अनेक संशयितांना ताब्यात घेतले. अनेक राजकीय गदारोळ झाला. आरोप प्रत्यरोप झाले. नाशिक मधून पूणे पोलिसांनी ललित पाटील याच्या वकील प्रज्ञा कांबळे व अर्चना निकम या मैत्रणी ताब्यात घेतले. त्यात ललित हा पुण्यातून पळाल्यानंतर त्याला सहारा देऊन पैसे पुरवल्याच्या आरोपा वरून अर्चना निकम व प्रज्ञा कांबळे हिला ड्रग्ज कारखाना चालवण्यासाठी मदत केल्या प्रकरणी गुन्ह्यात अटक केली.

आज दुपारी एक वाजता पूणे पोलिसांनी प्रज्ञा कांबळेला चौकशी साठी तिच्या दत्त मंदिर चौक जवळील ओनियन स्पेस या आलिशान बिल्डिंग मध्ये घेऊन गेले व दुपारी साडेतीन वाजेला पुन्हा घेऊन गेले. सुमारे अडीच तास तिची कसून चौकशी केल्याचे समजते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group