सातपूरमध्ये पेंटिंग काम करताना दुसऱ्या मजल्यावरून पडून दोन कामगारांचा मृत्यू
सातपूरमध्ये पेंटिंग काम करताना दुसऱ्या मजल्यावरून पडून दोन कामगारांचा मृत्यू
img
दैनिक भ्रमर

सातपूर -ध्रुवनगर परिसरात एका बांधकाम साईटवर इमारतीला पेंटींगचे काम करणाऱ्या, दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना काल घडली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ध्रुवनगर येथील मधुलक्ष्मी या खाजगी बांधकाम साईटवर, इमारतीला काल सायंकाळच्या सुमारास तुळशीराम माळी (वय ४०, रा. श्रमिकनगर) हे लाकडी झुल्यावर बसून दुसऱ्या मजल्याला रंग काम करत होते.

सदर झुल्या ची दोरी टेरेस वरून, विवेक कुमार (वय २६, मुळ रा. बिहार, हल्ली रा. श्रमिकनगर) याने पकडली होती. परंतु विवेक यांची दोरी वरील पकड निसटली. यामुळे विवेक चा तोल गेल्याने, विवेक सह, तुळशीराम हे खाली जमिनीवर पडून गंभीर जखमी झाले.

सदर घटनेत विवेक कुमार यांचा जागेवर मृत्यू झाला. तर तुळशीराम माळी यांचा खाजगी रुग्णालयात आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तुळशीराम माळी हे, गेली वीस वर्षापासून पेंटिंग चा व्यवसाय करत होते. श्रमिक नगर मधील संत सावता माळी मंडळ व क्रांतीसूर्य फाउंडेशन चे सदस्य होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group