Nashik Crime : फेसबुकच्या माध्यमातून विवाहित महिलेला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात; 5 वर्ष केले लैंगिक अत्याचार आणि मग...
Nashik Crime : फेसबुकच्या माध्यमातून विवाहित महिलेला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात; 5 वर्ष केले लैंगिक अत्याचार आणि मग...
img
दैनिक भ्रमर

नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर पाच वर्षे लैंगिक अत्याचार करून तिला लग्नास नकार देणाऱ्या तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही मूळची धुळे येथील रहिवासी असून, ती खासगी नोकरीनिमित्त सातपूर परिसरात राहते. ही महिला सन 2020 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात डिप्लोमाचे शिक्षण घेत असता फेसबुकच्या माध्यमातून हर्षद काशीनाथ क्षीरसागर (रा. मोखाडा, ता. जि. पालघर) याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर मार्च 2021 मध्ये हर्षद क्षीरसागर हा महिलेला भेटण्यासाठी धुळे येथे ती शिकत असलेल्या कॉलेजमध्ये आला.

त्यावेळी त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले; मात्र महिलेने “माझे यापूर्वी सन 2016 मध्ये लग्न झाले होते. पहिल्या पतीपासून मला एक मुलगी आहे; परंतु सन 2018 मध्ये त्याच्यासोबत फारकत झालेली असून, माझी मुलगी ही माझ्यासोबत राहते,” असे सांगितले. तरीही आरोपी हर्षद क्षीरसागर याने सांगितले, की तू मला खूप आवडतेस. तुझे लग्न झाले असले, तरीही चालेल, असे त्याने सांगितले. त्यानंतर फिर्यादी महिला व आरोपी हर्षद क्षीरसागर यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांचे वारंवार फोनवर बोलणे सुरू झाले. महिलेला डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जून 2021 मध्ये खंबाळे (ता. त्र्यंबकेश्वर) येथील एका ठिकाणी नोकरी मिळाली.

नोकरीच्या निमित्ताने ही महिला धुळ्याहून नाशिक येथे आली व सातपूर परिसरात भाड्याच्या घरात राहू लागली. फिर्यादी महिला ही नोकरीच्या ठिकाणी असताना मार्च 2022 मध्ये आरोपी हर्षद तिला भेटायला आला व “मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे,” असे म्हणाला. त्यानंतर त्याने महिलेला स्वत:च्या मोटारसायकलीवर बसवून खुटवडनगर येथील एका लॉजवर नेले. तेथे त्याने महिलेला लग्नाचे आश्वासन देऊन तिचा विश्वास संपादन केला व तेथेच शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपी क्षीरसागर याने वेळोवेळी जवळीक वाढवून तिच्याशी संबंध वाढविले. असे प्रकार पाच वर्षे सुरू असताना दि. 25 जानेवारी 2025 रोजी आरोपी हर्षद हा महिलेच्या घरी आला.

त्यावेळी महिलेने त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने “मी आता तुझ्यासोबत लग्न करणार नाही. आपले जे संबंध होते, ते विसरून जा,” असे सांगून तो निघून गेला. त्यानंतर महिलेने अनेकदा त्याला फोन करून लग्नाबाबत विचारले असता त्याने लग्नास नकार देऊन टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हर्षद क्षीरसागरविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखला करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक फुलपगारे करीत आहेत.

इतर बातम्या
नाशिक महानगरपालिकेचा

Join Whatsapp Group