तब्बल तीन दिवसांनी सापडला अनिकेतचा मृतदेह
तब्बल तीन दिवसांनी सापडला अनिकेतचा मृतदेह
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (प्रतिनिधी):- लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रात्री दारणा नदी बांधरा मध्ये आत्महत्या करणाऱ्या युवकाचा मृतदेह आज सकाळी सापडला.
 
अनिकेत संजय बोराडे (वय 22) चेहडी गाव, नाशिकरोड याने रविवारी लक्ष्मीपूजनच्या दिवशी रात्रीच्या सुमारास दारणा बंधारा येथे उडी घेऊन आत्महत्या केली. अग्निशमक दल, पंचवटी विभागातील उत्कृष्ट जलतरणपटू यांनी अनिकेत चा शोध घेतला.

मात्र तो नदी पत्रात मिळून आला नाही. आज सकाळी अनिकेत चा मृतदेह दारणा नदी पत्रात आढळून आला. नाशिकरोड पोलिसांनी या बाबत अकस्मित मृत्यु ची नोद केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group