पहारीचे घाव घालून पत्नीचा खून; आरोपी अटकेत
पहारीचे घाव घालून पत्नीचा खून; आरोपी अटकेत
img
Dipali Ghadwaje
नाशिक (प्रतिनिधी): दारूच्या नशेत पत्नीशी झालेल्या भांडणात पहारीचे घाव घालून तिचा खून केल्याची भीषण घटना इगतपूरी तालुक्यात घोटी खुर्द शिवारात गारमाथा शिवारात घडली आहे. घटना उघड होताच परिसरात खळबळ माजली असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, घोटी खुर्द येथील मुकूंदा हरिभाऊ वाघ (वय 50) याने गेल्या मंगळवारी सकाळी दारूच्या नशेत पत्नीशी भांडण केले. रागाच्या भरात त्याने लोखंडी पहारीने घाव घालून पत्नी सुमित्रा हिला जीवे ठार मारले. 

याप्रकरणी मयत सुमित्राचा भाऊ मंगळू लक्ष्मण वाघ (वय 28, रा. टाकेद, मु. रा. शेंडीची मेट, खोस, ता. मोखाडा जि. पालघर याने वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात मेहुणीविरूद्ध तक्रार नोंदविली आहे. पोलिसांनी भादंवि 302, 201 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group