नाशिक (प्रतिनिधी) :- विवाहित युवतीस लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करणार्या इसमाविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी 24 वर्षीय पीडित महिला ही चुंचाळे परिसरात दोन मुलांसह राहते. या महिलेला पहिल्या पतीने तलाक दिला आहे. त्यानंतर पहिल्या पतीचा मित्र आरोपी समशेर मुश्ताकअली शहा (रा. संजीवनगर, अंबड) याने या महिलेशी ओळख निर्माण केली.
त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. त्यावेळी आरोपी समशेर शहा याने या पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून मुलांचा सांभाळ करीन, असे सांगितले. आरोपीचे दि. 1 जानेवारी 2019 ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत पीडितेच्या घरी येणे-जाणे सुरू झाले. लग्नाच्या आमिषाने आरोपी समशेर शहा याने पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती केले.
काही दिवसांनी पीडित महिलेने मुलाला जन्म दिला. त्यानंतर पीडितेने आरोपीकडे लग्नाचा तगादा लावला असता त्याने लग्नास नकार दिला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आरोपी समशेर शहाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.