नाशिकमध्ये एकाची हत्या; 2 जण पोलिसांच्या ताब्यात
नाशिकमध्ये एकाची हत्या; 2 जण पोलिसांच्या ताब्यात
img
Chandrakant Barve

नाशिक :- नाशिक शहर पुन्हा एका खुनाच्या घटनेने हादरून गेले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, म्हसरूळ-आडगाव रोडवर थोड्यावेळापूर्वी 2 मद्यपी धिंगाणा घालत होते. त्यांच्यात वादही सुरू होते. तेथील काही नागरिकांनी त्यांना हटकले.

त्यांना पाहून मद्यपी पळू लागले. एक इसम त्यांच्या मागे पळाला. तेव्हा मद्यपींनी त्याच्यावर हल्ला केला. वार वर्मी लागल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यु झाला

या हल्ल्यात सौदे (वय 42) नामक इसमाचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्या सौदे यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, त्यात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group