नाशिक : खंडणीस्वरूपात रकमेची मागणी करून सव्वाबारा लाख रुपयांची फसवणूक
नाशिक : खंडणीस्वरूपात रकमेची मागणी करून सव्वाबारा लाख रुपयांची फसवणूक
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - खंडणीस्वरूपात एका इसमाकडून रक्कमेची मागणी करुन सात जणांनी संगनमत करून सव्वाबारा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करुन अपहार केल्याचा प्रकार गंगापूर रोड येथे घडला.



याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी विजय अर्जुन पाटील (रा. विश्‍वधारा सोसायटी, महात्मानगर, नाशिक) असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव आहे. आरोपी भार्गव ज्ञानेश्‍वर देशमुख (रा. गोकुळ पार्क, अंबड लिंकरोड), अभिजित थोरात (रा. बीएसएनएल बिल्डिंग, दत्तमंदिर रोड, नाशिकरोड), चैतन्यसिंग मोहनिया (रा. सूखशांती हाईट्स, नरसिंहनगर, गंगापूर रोड), अनुराग आपटे (रा. बीएसएनएल बिल्डिंग, दत्तमंदिर रोड, नाशिकरोड), योगेश जीवन मोहीत (रा. नाशिक), पूजा शिसोदे (मोहीते) व नरेशकुमार तुकाराम बहिरम (रा. कर्मयोगी-नगर, नाशिक) यांनी संगनमत करुन फिर्यादी विजय पाटील यांना मारहाण व शिवीगाळ केली. 

तसेच आरोपींनी फिर्यादीच्या पत्नीच्या बँक खात्याचे चेक बळजबरीने घेऊन त्याचा गैरवापर केला. त्याचप्रमाणे फिर्यादीकडे खंडणी स्वरूपात रकमेची मागणी करून फिर्यादीची एकूण 12 लाख 25 हजार रुपयांची रक्कम परस्पर खंडणी म्हणून मागणी करून आर्थिक फसवणूक करत त्या रकमेचा अपहार केला. हा प्रकार जानेवारी ते ऑगस्ट 2023 या कालावधीत महात्मानगर व नरसिंहनगर येथील बँक ऑफ बडोदा येथे घडला.

याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध खंडणी, फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group