नाशिकमध्ये
नाशिकमध्ये "या" भागात शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार
img
दैनिक भ्रमर



मनपाचे मुकणे डॅम रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील रेमण्ड सबस्टेशन गोंदे येथुन एक्सप्रेस फिडरवरुन जॅकवेलसाठी ३३ के.व्ही. वीजपुरवठा कार्यान्वित आहे.

महावितरण कंपनीच्या रेमण्ड सबस्टेशन येथे शनिवार दि.८/११/२०२५ रोजी महावितरण कंपनीमार्फत सकाळी १० ते दु. ४ दरम्यान ५० MVA ट्रान्सफॉर्मर दुरूस्ती व चाचणी कामी विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्या बाबतचा ई-मेल मनपाचे कार्यकारी अभियंता (यां), मनपा नाशिक यांना प्राप्त झालेला आहे.

त्यानुसार मनपाचे मुकणे डॅम रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथून विल्होळी जलशुध्दीकरण केंद्राला होणारा रॉ वॉटरचा पुरवठा सदर कालावधीत बंद राहणार आहे. त्यानुसार सदर कालावधीत विल्होळी जलशुध्दीकरण केंद्राचा पाणी पुरवठा बंद राहील, त्यामुळे सदर जलशुध्दीकरण केंद्र येथून नाशिक शहरातील नवीन नाशिक व नाशिक पुर्व भागास पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही.

म्हणून शनिवार दिनांक दि.८/११/२०२५ रोजी सकाळी ९ ते  दुपारी ५ दरम्यान विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र येथून खालील भागात होणारा पाणीपुरवठा बंद राहील, तसेच रविवार दि. ९/११/२०२५ रोजीचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. याची सदर परिसरातील नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

नविन नाशिक विभागातील  
प्र.क्र.२२ भागश: प्र.क्र.२४ भागश: प्र.क्र.२५ भागश: प्र.क्र.२६ भागश: प्र.क्र.२७ भागश: प्र.क्र.२८ भागश:, प्र.क्र.२९  भागश: प्र.क्र.३०  भागश: ३० पुर्ण  पाणी पुरवठा होणार नाही.

नाशिक रोड,
प्रभाग क्र. २२ मधील वडनेर गेट, पंपीग पर्यंत, व रेंज रोड या परिसरात पाणी पुरवठा होणार नाही.

नाशिक पुर्व विभाग
नाशिक पुर्व विभागातील प्रभाग क्र. १४ भागश:, प्र.क्र. २३ भागशः, प्र.क्र.  ३० पुर्ण
इतर बातम्या
Join Whatsapp Group