पार्ट टाईम जॉब देण्याच्या आमिषाने तरुणाची २० लाखांची फसवणूक
पार्ट टाईम जॉब देण्याच्या आमिषाने तरुणाची २० लाखांची फसवणूक
img
Dipali Ghadwaje
नाशिक (प्रतिनिधी) : पार्ट टाईम जॉब देण्याचा बनाव करून अज्ञात इसमांनी वेगवेगळ्या खात्यांवर पैसे भरण्यास सांगून एका तरुणाची 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विशाल शिवनारायण गुप्ता (वय 27, रा. विद्या भवन, आर. टी. ओ. ऑफिसशेजारी, पेठ रोड, पंचवटी) हा सुशिक्षित तरुण ऑनलाईन साईटवर नोकरीचा शोध घेत होता. त्यादरम्यान, अज्ञात टेलिग्रामधारकाने गुप्ता याच्याशी संपर्क साधला. 

त्यावेळी अज्ञात भामट्याने वेगवेगळ्या टेलिग्राम ग्रुपमार्फत पार्ट टाईम जॉब देण्याचा बनाव करून फिर्यादी गुप्ता याला वेगवेगळ्याबँक खात्यांवर पैसे भरण्यास लावले. त्यानंतर फिर्यादी गुप्ता याने 14 ते 19 एप्रिल 2023 या कालावधीत वेळोवेळी वेगवेगळ्या खात्यांमध्ये 20 लाख 17 हजार 474 रुपये जमा केले; मात्र अज्ञात भामट्याने या तरुणाला ठकविण्याच्या उद्देशाने खेोटे जॉब देऊन त्याची फसवणूक केली.

अज्ञात भामट्याने बँक खात्यात जमा झालेली 20 लाख 17 हजार रुपयांची रक्कम स्वीकारूनही पार्ट टाईम जॉब न देता फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group