Nashik crime news : पंचवटीत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; खून झाल्याची शक्यता
Nashik crime news : पंचवटीत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; खून झाल्याची शक्यता
img
दैनिक भ्रमर
नाशिक (प्रतिनिधी) : पंचवटीत एका तरुणीचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या आहे की घातपात, याचा शोध पोलीस घेत आहेत.


याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की पंचवटीतील दत्त चौक परिसरात एका ठिकाणी 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आला. या तरुणीच्या गळ्यावर निशाण असल्याने तिची हत्या केली असल्याची शंका वर्तविण्यात येत आहे.
 
घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम्‌‍ माचरे हे घटनास्थळी पथकासह दाखल झाले. मृतदेहाची तपासणी करून शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. त्याचा अहवाल आल्यानंतरच या घटनेबाबत स्पष्टता येईल, असे पोलिसांनी सांगितले.

ही तरुणी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील रहिवासी असल्याचे तिच्या आधारकार्डावरून समजले. ती शिक्षणासाठी नाशिकमध्ये राहत होती. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इतर बातम्या
नाशिकमध्ये

Nashik :

Join Whatsapp Group