गजरा उद्योग समूहाचे संचालक हेमंत पारख सुखरूप परतले; अपहरणकर्त्यांचा शोध सुरू
गजरा उद्योग समूहाचे संचालक हेमंत पारख सुखरूप परतले; अपहरणकर्त्यांचा शोध सुरू
img
Dipali Ghadwaje
नाशिक :- शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि गजरा उद्योग समूहाचे संचालक हेमंत पारख यांचे काल रात्रीच्या सुमारास अपहरण झाले होते.

या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तातडीने पारख यांच्या शोधासाठी पथके रवाना करत अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. दरम्यान बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांची अपहरणकर्त्यांकडून सुखरूप झुटका झाल्यानंतर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ त्यांच्या भेटीला घरी दाखल झाले असून सर्व माहिती जाणून घेत आहेत.

अपहरणकर्त्यांनी हेमंत पारख यांना गुजरातमधील वलसाड येथे सोडून दिल्याचे समजते. ते सुखरूप असून पोलिसांकडून अपहरणकर्त्यांचा शोध घेत आहेत. पारख हे काल रात्रीच्या सुमारास आपल्या निवासस्थानाबाहेर उभे असताना चारचाकी आणि दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात अपहरणकर्त्यांनी त्यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांचे अपहरण केले होते. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना केली. 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यानंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते. आता पोलिसांना पारख यांची सुखरूप सुटका करण्यात यश आल्याची माहिती मिळत आहे. 

हेमंत पारख यांचे अपहरण का झाले हे अद्याप समजलेले नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group