पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची 5 जानेवारी रोजी त्याच्या लग्नाच्या वाढदिवशीच दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती.
शरद मोहोळची हत्या झाल्यानंतर काही तासांमध्ये सात जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर 15 जानेवारी रोजी पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने आणखी दहा जणांना पनवेल आणि वाशीमधून अटक केली.
शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे याच्यासह तिघांना पुणे पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. गणेश मारणे हा अनेक दिवसांपासून फरार होता. पुणे पोलीस गुन्हे शाखेने नाशिक रोड येथून अटक केली.