२५ हजारांची लाच घेताना मंडल अधिकारी जाळ्यात
२५ हजारांची लाच घेताना मंडल अधिकारी जाळ्यात
img
दैनिक भ्रमर
येवला (दीपक सोनवणे) :- राजापूर येथील मंडल अधिकाऱ्यास पंचवीस हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार राजापूर येथील तक्रारदार यांचे न्यायप्रविष्ठ असलेले जमीन नोंदीचे प्रकरण हे मंडल अधिकारी मनोहर राठोड यांनी नामंजूर केले होते. मात्र सदरचे प्रकरण मंजूर करून देतो याकरता 25 हजारांची लाच ही येवला शहरात कोटमगाव रोड परिसरामध्ये स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षिका शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, अप्पर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर, पोलीस हवालदार प्रभाकर गवळी पोलीस नाईक संजय ठाकरे यांनी ही कारवाई केली.

मनोहर राठोड यांना अटक करून चौकशीसाठी येवला शहर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असून गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group