6 लाख 50 हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवकासह 1 जण जाळ्यात
6 लाख 50 हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवकासह 1 जण जाळ्यात
img
दैनिक भ्रमर

नाशिक : साडे सहा लाखांची लाच घेताना ग्रामसेवकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. मनोज पावरा , ग्रामसेवक, पंचायत समिती , अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार, (रा. दामोदर नगर, तळोदा) व खासगी इसम लालसिंग सिमजी वसावे, (रा. गमण, तालुका अक्कलकुवा,  जिल्हा नंदुरबार) अशी लाच घेणाऱ्या दोघाची नावे आहेत.           

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांची पत्नी ग्रामपंचायत सिंदुरी, तालुका अक्कलकुवा येथे सन २०१६ ते २०२० कालावधीत सरपंच होत्या. यानंतर ग्रामपंचायतीवर शासनाचे प्रशासक कार्यरत होते. या काळात ग्रामपंचायत सिंदुरी अंतर्गत मंजूर असलेले रस्ता काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक बसवणे अशी विविध आठ प्रकारची ग्रामपंचायतीला मंजूर असलेली कामे तक्रारदार व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी पूर्ण केली आहेत.

ही कामे पूर्ण झाल्यानंतर कामांबाबतचे बिल ३२,३४,००० ग्रामपंचायत सिंदुरीच्या बँक खात्यात शासनाकडुन आले आहेत. नमूद कामांच्या बिलाचे चेक देण्याच्या मोबदल्यात दोघांनी तक्रारदाराकडे ३२,३४,००० या रकमेच्या वीस टक्के रक्कम म्हणजे ६,४७,००० रुपये लाचेची मागणी केली. आज ६,४७,००० रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक राकेश आ. चौधरी, पोलीस निरीक्षक समाधान वाघ, पोलीस निरीक्षक माधवी वाघ, पोहवा विलास पाटील,  पोहवा देवराम गावित, पोना संदीप नावाडेकर, पोना नरेंद्र पाटील,      पोना सुभाष पावरा, पोना संदीप खंदारे, पोना हेमंत महाले, चापोना जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group