6 लाखांची लाच घेताना वित्त व लेखाधिकारी जाळ्यात
6 लाखांची लाच घेताना वित्त व लेखाधिकारी जाळ्यात
img
दैनिक भ्रमर

6 लाखांची लाच घेताना वित्त व लेखाधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

सिध्देश्वर मधुकर शिंदे वय ३९, धंदा-नोकरी (वित्त व लेखाधिकारी) तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट, तुळजापुर, जि. धाराशीव (वर्ग २) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे शासकीय कॅान्ट्रॅक्टर असुन तक्रारदार यांना श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापुर संचलित श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालयाचे प्रशासकीय इमारतीचे पहिल्या मजल्याचे तसेच प्रवेशद्वार व संरक्षक भिंतीचे बांधकामाचे 3 करोड 88 लाखाचे कान्ट्रॅक्ट मिळाले होते. या बांधकामाचे 90 टक्के काम पुर्ण झाले आहे.

या बांधकामाचे आत्तापर्यंत 2 करोड पेक्षा जास्त बिल तपासणी करुन मंजुरीसाठी पाठवून मिळवून दिले म्हणुन तसेच उर्वरीत बिल तपासणी करुन मंजुरीसाठी पाठविण्यासाठी तसेच अतिरिक्त सुरक्षा रक्कम म्हणुन भरलेली 34,60,579 रुपये ही परत मिळवून देण्यासाठी शिंदेने 10 लाख रुपयांची लाच मागितली.

तडजोडीअंती 6 लाख रुपये घेण्याचे ठरले. आज 6 लाख रुपयांची लाच स्विकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. शिंदेवर पोलीस स्टेशन तुळजापुर, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group