कार दोनदा पेटली.. पासपोर्ट कार्यालयाच्या बेसमेंट मधील प्रकार...
कार दोनदा पेटली.. पासपोर्ट कार्यालयाच्या बेसमेंट मधील प्रकार...
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (प्रतिनिधी):-येथील पासपोर्ट कार्यालयाच्या बेसमेंट मधील पार्किंग मध्ये कार पार्क करून व्यायाम करण्यासाठी जिम मध्ये गेलेल्या तरुणाच्या गाडीने दोन वेळा अचानक पेट घेतल्याने गाडी जळून खाक झाली. वेळीच अग्निशमन दल पोहचल्याने इतर गाड्या मात्र या आगी पासून वाचल्या.

नाशिक पूणे माहामार्ग वरील शिखरेवाडी समोरील पासपोर्ट कार्यालय खाली असलेल्या बेसमेट मध्ये शनिवारी रात्री आठ वाजेला विजय दोंदे यांनी आपली होंडा सिटी कार क्र MH 15BX7207 लावून वरच्या मजल्यावर व्यायाम करण्यासाठी जिम मध्ये गेले. काही वेळाने बेसमेंट मधून धुराचे लोट बाहेर येऊ लागले आणि एकच धावपळ उडाली.

त्यात होंडा सिटी गाडीने पेट घेतला. आग लागलेल्या कार च्या आसपास लावलेल्या वाहन धारकांनी आपले वाहन वाचवण्यासाठी लगबग केली. काही सुजाण नागरिकांने सदर बाब तात्काळ नाशिकरोड येथील अग्निशमन दलाला कळवली. जवानानी शर्थी चे प्रयत्न करून इतर वाहने वाचवली व फोम च्या सहाय्याने जळती होंडा सिटी कार विझवली मात्र रात्री बारा वाजेला पुन्हा गाडीने पेट घेतला व त्यात ती पूर्णतः जळून खाक झाली.

वेळीच घटना लक्षात आल्याने व अग्निशमन दल तात्काळ पोहचल्याने आग आटोक्यात आली अन्यथा जळीत कार च्या थिनग्यांनी इतर गाड्या आगीत भास्मसात झाल्या असत्या. अग्निशमन दलाचे प्रकाश कर्डक, उमेश गोडसे, रामदास काळे, राजाभाऊ गोसावी आदी जवानांनी आग विझावन्या साठी परिश्रम घेतले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group