शिवसेनेच्या नगरसेवकावर गोळीबाराचा प्रयत्न
शिवसेनेच्या नगरसेवकावर गोळीबाराचा प्रयत्न
img
दैनिक भ्रमर


आज सकाळी शिवसेनेच्या नगरसेवकांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र गावठी कट्ट्यातील गोळी कट्ट्यातच अडकल्याने पठारे बचावले. पठारे यांच्या समवेत असलेल्या एकाने गोळीबार करणाऱ्याच्या हातातील कट्टा हिसकावून घेतला. ही घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


युवराज पठारे हे शिवसेनेचे नगरसेवक व पारनेर तालुका तालीम संघाचे अध्यक्ष आहेत. घटनेनंतर महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांनी दूरध्वनीवरून पठारे यांची चौकशी केली. गोळीबाराचा प्रयत्न करणारा अल्पवयीन असून तो पारनेर तालुक्यातीलच रहिवासी आहे.

नगरसेवक पठारे यांच्या हत्येचा प्रयत्न का करण्यात आला, याची चौकशी पोलीस करत आहेत. संबंधीत अल्पवयीन युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर पारनेर पोलीस ठाण्यासमोर पठारे समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

पारनेर शहरातील बसस्थानकालगत असलेल्या मुख्य चौकातील हॉटेल दिग्विजयमध्ये नगरसेवक पठारे त्यांच्या मित्रांसह चहा घेत होते. तेथे अल्पवयीन युवक गावठी कट्टा व चाकू घेऊन आला. त्याने युवराज पठारे यांच्या छातीवर गावठी कट्टा रोखला व गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र गोळी कट्ट्यातच अडकल्याने केवळ आवाज झाला. तेथे उपस्थित असलेले पठारे यांचे सहकारी भरत गट यांनी त्या युवकाच्या हातून कट्टा हिसकावून घेतला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group