रामवाडीत गोदावरी नदीपात्रात आढळला मृतदेह मृतदेह कुजल्यामुळे ओळख पटविण्याचे आव्हान
रामवाडीत गोदावरी नदीपात्रात आढळला मृतदेह मृतदेह कुजल्यामुळे ओळख पटविण्याचे आव्हान
img
दैनिक भ्रमर
नाशिक (प्रतिनिधी) : रामवाडी येथील गोदा नदीपात्रात गुरुवारी (दि. 15) दुपारच्या सुमारास एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सुमारे दोन ते तीन दिवसांपासून हा मृतदेह पाण्यातच असल्याने पूर्ण कुजून गेला होता.

त्यामुळे मृतदेह महिलेचा की पुरुषाचा आहे, तसेच खून की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस तपास करीत आहेत. नदीपात्रातील पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना बरेच कष्ट करावे लागले. याकरिता त्यांनी परिसरातील काही समाजसेवकांना हाताशी धरून व गोदापात्रात सध्या सुरू असलेल्या पाणवेली काढण्याच्या मशीनद्वारे हे प्रेत बाहेर काढले; मात्र ते रुग्णालयात नेणे अशक्य असल्याने अखेर जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनाच घटनास्थळी पाचारण केले जाणार असल्याचे समजते.

नदीपात्रात आढळलेल्या प्रेताच्या अंगावरील कपड्यांवरून काही ओळख लागते का, यासंदर्भात पोलिसांची तपासाची चक्रे फिरू लागली आहेत. या घटनेमुळे रामवाडी परिसरात बघ्यांची गर्दी वाढल्याने पुलावरील वाहतूक यंत्रणा ठप्प झाली होती, अखेर अधिक पोलीस बंदोबस्त मागवून रस्ता मोकळा केल्याने काही वेळाने वाहतूक सुरळीत झाली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group