आगीचं सत्र सुरुच! गोवंडी परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग; अनेक झोपड्या जळून खाक
आगीचं सत्र सुरुच! गोवंडी परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग; अनेक झोपड्या जळून खाक
img
Dipali Ghadwaje
मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे.  मुंबईतील गोवंडी-शिवाजी नगर आणि आदर्श नगर परिसरातील झोपडपट्टीला शनिवारी (दि.१७) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीचा क्षणार्धात आगीचा भडका उडल्याने संपूर्ण झोपडपट्टीला विळखा पडला. 

दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. 

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास काही झोपड्यांना अचानक आग लागली. आग लागल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. अनेकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, क्षणार्धात आगीचा भडका उडल्याने संपूर्ण झोपडपट्टीला विळखा पडला. त्यामुळे नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी मोकळ्या जागेत धाव घेतली.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. 

या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच, सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, परिसरातील अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. यामुळे स्थानिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
mumbai | fire |
इतर बातम्या
Join Whatsapp Group