मोठी बातमी !  घोलपांचे राजकीय भवितव्य पुन्हा टांगणीला
मोठी बातमी ! घोलपांचे राजकीय भवितव्य पुन्हा टांगणीला
img
दैनिक भ्रमर
शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी नुकताच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. त्यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. सध्या ते शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडून संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. 

मात्र आता बबनराव घोलप यांना एका खटल्यात झालेल्या शिक्षेच्या अपिलावरील सुनावणी आज होऊ शकली नाही. त्यामुळे घोलप लोकसभा निवडणूक लढवणार की नाही, हा निर्णय आता लांबला आहे. 

माजी मंत्री घोलप यांना जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावलेली शिक्षा आणि दंड याबाबत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील केले होते. या अपिलावर गेली काही वर्षे सुनावणी सुरू आहे. त्याचा अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही.

ज्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होती. मात्र, आज सुनावणीसाठी असलेल्या अपील न्यायमूर्ती कर्णिक यांच्या न्यायालयात होते. आजच्या सुनावणीसाठीच्या खटल्यांची संख्या मोठी होती. बबनराव घोलप यांच्या खटल्याचा क्रम २६ होता. त्यात बराच कालापव्यय होणार असल्याने आजची सुनावणी होऊ शकली नाही. आता या खटल्यावर येथे २८ मार्चला सुनावणी होईल.माजी मंत्री घोलप यांना एका खटल्यात शिक्षा आणि दंड झालेला आहे. 

त्यामुळे ते निवडणूक लढविण्यास अपात्र ठरतात. त्यामुळे घोलप यांनी या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर आज निर्णय अपेक्षित होता. मात्र, हा निर्णय न झाल्याने घोलप यांनी निवडणूक लढवायची की नाही, याबाबतचा निर्णय पुढील सुनावणीपर्यंत लांबणीवर गेला आहे.

लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित आहे. अशा स्थितीत घोलप शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करणार असल्याने त्यांच्या राजकीय करिअरसाठी आता 28 मार्च ही तारीख निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group