आयकर विभागाने कानपूरमधील एका तंबाखू कंपनीवर छापा टाकला. या छापेमारीत सापडलेलं घबाड पाहून अधिकारीही चक्रावून गेले. नयागंज येथील बंशीधर एक्सपोर्ट आणि बंशीधर टोबॅको कंपनीवर आयकर अधिकारी सातत्याने ही कारवाई करत आहेत. या कारवाईत बंशीधर टोबॅको प्रायव्हेट लिमिटेडचे मालक के.के. मिश्रा यांच्या दिल्लीतील निवासस्थानातून 50 कोटींहून अधिक किमतीच्या कार सापडल्या आहेत. या छापेमारीमुळे मोठी खळबळ बघायला मिळतंय.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने टाकलेल्या या छापेमारीत आतापर्यंत सुमारे 4 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये रोल्स रॉयस फँटम, मॅक्लारेन, लॅम्बोर्गिनी आणि फेरारी अशा आलिशान गाड्यांचा समावेश आहे.
दरम्यान उत्तर प्रदेशातील कानपूरचं नाही तर इतर राज्यांतील कंपनीशी संबंधित लोकांच्या ठिकाणांचीही चौकशी सुरू आहे. यापैकी गुजरात, आंध्र प्रदेश आणि दिल्लीत आयकर विभाग तपास करत आहे. या छापेमारीत आयकर विभागाने 4.5 कोटी रुपयांची रोकड जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे. तर काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
संबंधित कंपनी खात्यांमध्ये दाखवलेल्या कंपनीला बनावट धनादेश देत होती, तर दुसरीकडे इतर मोठ्या पान मसाला घरांना उत्पादन पुरवत होती. त्यामुळे ही धाड टाकण्यात आली.
सुमारे 80 वर्षांपासून तंबाखूचा व्यवसाय करणाऱ्या फर्मचे मालक केके मिश्रा उर्फ मुन्ना मिश्रा यांचे नयागंज येथे जुने कार्यालय आहे. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास आयकर विभागाचे अधिकारी 6 वाहनांत आले आणि त्यांनी संपूर्ण परिसर आपल्या ताब्यात घेतला.तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांचे मोबाईलही काढून घेतले. कागदी कागदपत्रांसह इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त करण्यात आली. सध्या रिअल इस्टेट, बेनामी मालमत्तांशिवाय रोख रकमेचाही शोध सुरू आहे.