नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, हातात तलवार घेऊन व्हिडीओ केला पोस्ट!
नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, हातात तलवार घेऊन व्हिडीओ केला पोस्ट!
img
Dipali Ghadwaje
कर्नाटकमधील मोहम्मद रसूल कद्दारे नावाच्या एका व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवे मारण्याची धमकी दिलीय. त्याने समाजमाध्यमांवर हातात तलवार घेऊन एक व्हिडीओ शेअर केला आहे. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास मी मोदींना जीवे मारणार अशी धमकी त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून दिलीय. हा व्हिडीओ समाजमाध्यावर व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकमधील सूरपूर पोलीस ठाण्यात या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.  हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

मोहम्मद रसूल कद्दरे नावाच्या व्यक्तीवर सोशल मीडियावर संबंधित व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्हिडिओत त्याने काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असे यादगिरी पोलिसांनी सांगितले.


आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कलम ५०५ (१) (ब), २५ (१) (बी) अन्वये यादगिरीच्या सुरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. "आपल्या मोबाईल फोनवर सेल्फी व्हिडिओ बनवत रसूलने पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरले," पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कद्दरे यादगिरी जिल्ह्यातील रंगापेठचा रहिवासी आहे, तो हैदराबादमध्ये मजुरीचे काम करतो. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी मोहम्मद हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group