नाशिक : जिल्ह्यामध्ये सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तीन धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. नागरिकांनी सावधानी बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
गुरुवारी रात्रीपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे शुक्रवारी दुपारी गंगापूर धरणातून 1040 क्युसेस पाण्याच्या विसर्ग करण्यात येत आहे तर नांदूर मधमेश्वर या धरणातून शुक्रवारी 321 पाण्याचा विसर्ग हा नदीपत्रात करण्यात येत आहे.
सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे कडवा धरण क्षेत्र परिसरात देखील चांगला पाऊस आहे. त्यामुळे कडबा धरणातून देखील 848 क्युसेस पाणी हे कळवा नदीपत्रात सोडण्यात आले आहे. जर पाऊस असाच सुरू राहिला तर अजून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
दरम्यान नदीपत्रांमध्ये सुरू झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे