१४ मार्च २०२४
नाशिक (प्रतिनिधी) :- लग्नाचे आमिष दाखवून महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्या पोलीस अंमलदाराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी रोहिदास हिरामण गवळी (रा. मु. पो. सुभाषवाडी, ता. मालेगाव) याची ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलीस अंमलदार म्हणून नेमणूक आहे, तर फिर्यादी पीडित महिला ही पंचवटी परिसरात राहते. आरोपी रोहिदास गवळी याने पीडितेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत परिचय वाढविला.
त्यानंतर दि. 8 ऑक्टोबर 2022 ते 7 डिसेंबर 2023 या कालावधीत तिला नाशिक मधील विविध हॉटेलमध्ये नेत तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिची फसवणूक केली, तसेच पीडितेने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपी गवळी याने पीडितेला फोनवर वाईटसाईट शिवीगाळ करून दमदाटी केली.
या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात रोहिदास गवळी या पोलीस अंमलदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वर्षा पाटील करीत आहेत.
Copyright ©2024 Bhramar