13 हजारांची लाच घेताना मंडल कृषि अधिकारी जाळ्यात
13 हजारांची लाच घेताना मंडल कृषि अधिकारी जाळ्यात
img
दैनिक भ्रमर
13 हजारांची लाच घेताना मंडल कृषि अधिकाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.  पांडुरंग नामदेव मस्के, वय 28, असे लाच घेणाऱ्या मडंल कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रादार हे मोर्शी येथील रहिवाशी असून शेती करतात. तक्रारदार यांनी कृषी विभागाचे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेअंतर्गत शेतातील संत्रा बागेची पुनर्जीवनाकरिता मिळणाऱ्या अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज सादर केला होता. त्या संबंधाने तक्रारदार हे तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोर्शी येथील मंडळ कृषी अधिकारी पांडुरंग मस्के यांना भेटले.

त्यांनी तक्रारदार यांना सदर योजनेमध्ये तुम्हाला लाभ मिळू शकत नाही तरीसुद्धा मी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवून देतो. या योजनेचे अनुदान तुमच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर तुम्हाला मिळणाऱ्या अनुदानापैकी 50 टक्के रक्कम मला मोबदला म्हणून द्यावी लागेल.

घोटी-सिन्नर महामार्गावर अंगावर शहारे आणणारी घटना


त्यामुळे त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. आज केलेल्या पडताळणी कार्यवाही मध्ये 15000 रुपयांची मागणी करून तडजोडीअंती 13000 रुपये लाच रक्कम स्वीकारल्याने वर नमुद मस्के यांना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन मोर्शी जि. अमरावती येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक अनील पवार, पोलीस उप अधीक्षक मिलींदकुमार अ. बहाकर, पोलीस निरीक्षक योगेशकुमार दंदे, पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे, पोशि आशिष जांबोळे, पोशि शैलेश कडु, पोशि उपेद्र थोरात, चालक पोउपनि सतिश कीटुकले यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group