मोठी बातमी : गांधी घराण्याचा 'हा' वारसदार काँग्रेसमध्ये परतणार? बड्या नेत्यानं दिली ऑफर
मोठी बातमी : गांधी घराण्याचा 'हा' वारसदार काँग्रेसमध्ये परतणार? बड्या नेत्यानं दिली ऑफर
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : पिलभित लोकसभा मतदारसंघातून भाजपनं वरुण गांधी यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यांनी भाजपात असताना अनेकदा मोदी सरकारच्या धोरणांवर टीकाही केली आहे. त्यामुळंच त्यांना उमेदवारी नाकारल्याचं बोललं जात आहे. पण आता काँग्रेसनं वरुण गांधी यांना सोबत येण्याची ऑफर दिली आहे. पण वरुण गांधी काँग्रेसची ही ऑफर स्विकारतील का? असा प्रश्न विचारला जात आहे.  

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे धाकटे सुपुत्र संजय गांधी आणि त्यांचा पत्नी मनेका गांधी यांचे वरुण गांधी हे सुपुत्र आहेत. गांधी घराण्यासाठी आणि काँग्रेसशी त्यांचा घनिष्ट संबंध आहे. पण काळाच्या ओघात संजय गांधी यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचं कुटुंब काँग्रेसपासून दुरावलं. त्यानंतर मनेका गांधी यांनी पुत्र वरुण गांधी यांच्यासह भाजपत प्रवेश केला. त्यानंतर दोघेही भाजपचे खासदार राहिले. पण यंदा वरुण गांधींना भाजपनं उमेदवारी नाकारली आहे.  

दरम्यान, काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी यांनी आरोप केला की, भाजपनं ४४ वर्षीय वरुण गांधी यांना उमेदवारी नाकारली ज्यांची मुळं गांधी कुटुंबाशी जोडलेली आहेत. पण वरुण गांधींनी जर काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर आम्हाला आनंदच होईल, ते बडे नेते आहेत तसेच उच्चशिक्षित राजकारणी आहेत. त्यांची राजकारणातील प्रतिमा ही पारदर्शी आहे. त्यांचे गांधी कुटुंबाशी संबंध आहेत.

 त्यामुळेच भाजपनं त्यांना तिकीट नाकारलं आहे. त्यामुळं वरुण गांधी यांनी आता काँग्रेसमध्ये यावं अशी आमची इच्छा आहे. भाजपनं लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी रविवारी जाहीर केली. यामध्ये उत्तर प्रदेशातील पिलभीत लोकसभा मतदारसंघात जे सध्याचे विद्यमान खासदार आहेत, त्यांना भाजपनं उमेदवारी नाकारली आहे. पण त्यांच्या मातोश्री मनेका गांधी यांना तुल्तानपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group