लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.अशातच ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना ईडीचे समन्स आले आहे. अमोल किर्तीकर यांना खिचडी घोटाळ्यात ईडीने समन्स पाठवले आहेत. आज अमोल कीर्तिकर यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. खिचडी गैरव्यवहार प्रकरणात चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे. अमोल किर्तीकर उत्तर पश्चिम मधून लोकसभेचे उमेदवार आहेत.
दरम्यान आज अमोल कीर्तिकर यांना आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचा समन्स बजावण्यात आला आहे. या ईडीच्या समन्समुळे अमोल कीर्तिकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कोरोना काळात झालेल्या खिचडी घोटाळ्याप्रकरणी कीर्तिकरांना ईडीने समन्स बजावले आहे.
विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी हे समन्स देण्यात आले असून आज (27 मार्च) सकाळी 11:00 वाजता त्यांना चौकशीसाठी बोलवले आहे. खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाण यांच्यासोबत अमोल कीर्तिकर यांचे नाव समोर आले होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली होती. त्यानंतर आता ईडीने समन्स पाठवून चौकशीला बोलवले आहे.
अमोल किर्तीकरांना समन्स बजावण्यात आला आहे. त्यामुळे आज किर्तीकरांची किती तास चौकशी होणार हे ही पाहणं महत्त्वाचं आहे. तर ठाकरे गटाची लोकसभेची पहिली यादी जाहीर झाली असून त्यामध्ये किर्तीकरांना उमेदवारी देण्यात आली आहे.