काँग्रेस नेते राहुल गांधींकडे स्वतःची कार नाही, कॅश फक्त ५५ हजार रुपये; किती एकूण संपत्ती?
काँग्रेस नेते राहुल गांधींकडे स्वतःची कार नाही, कॅश फक्त ५५ हजार रुपये; किती एकूण संपत्ती?
img
Dipali Ghadwaje
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या उमेदवारी अर्जामध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्या एकूण संपत्तीचा उल्लेख केला आहे. ज्यामध्ये त्यांच्याकडे २० कोटी रुपये संपत्ती असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
 
राहुल गांधींची संपत्ती किती?
वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधी यांच्याकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी आपल्या संपत्तीचा उल्लेख केला आहे. राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे ५५ हजार रुपये रोख रक्कम, २६ लाखांचे बँक डिपॉझिट तर शेअर बाजारात सव्वा ४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

त्याचबरोबर राहुल गांधी यांच्याकडे ४ लाखांचे सोन्याचे दागिने, हरियाणातील गुरुग्राममध्ये ९ कोटी रुपये किमतीचे कार्यालय आहे. तसेच राहुल गांधी यांच्याकडे स्वतःची कार नसल्याचेही त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group