काँग्रेसची खेळी! भाजपच्या उमेदवाराला  पाडण्यासाठी 'या' नेत्याला उमेदवारी
काँग्रेसची खेळी! भाजपच्या उमेदवाराला पाडण्यासाठी 'या' नेत्याला उमेदवारी
img
दैनिक भ्रमर
काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये १० उमेदवारांची नावे असून कन्हैया कुमार यांचेही या यादीमध्ये नाव आहे. त्यांना उत्तर पूर्व दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांची लढत भाजपच्या मनोज तिवारी यांच्याविरोधात होणार आहे. 

लोकसभा निवडणुकाचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. देशामध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. भाजप आणि काँग्रेसकडून त्यानुसार उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. काँग्रेसने नुकतेच १० उमेदवारांची यादी जाहीर केलीये. यात तीन दिल्ली, सहा पंजाब आणि एक उत्तर प्रदेशातील उमेदवारांची नावे आहेत. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे ढग ; या भागात 'यलो' अलर्ट जारी

दिल्लीच्या चांदणी चौक मतदारसंघातून जेपी अग्रवाल, उत्तर पूर्व दिल्लीतून कन्हैया कुमार, उत्तर पश्चिम दिल्लीतून उदित राज यांना तिकीट देण्यात आलं आहे. पंजाबमध्ये अमृतसरमधून गुरजीत सिंग औजला, जालंधरमधून माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, फतेहगड साहिबमधून अमर सिंह, भटिंडा मधून जीत मोहिंदर सिंग सिद्धू, संगरुरमधून सुखपाल सिंह खैरा आणि पटियालामधून डॉ. धर्मवीर गांधी यांना तिकीट देण्यात आलं आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील इलाहाबाद जागेवरुन उज्ज्वल रेवती रमन सिंह यांना संधी देण्यात आली आहे.

कन्हैया कुमार हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. यावेळी त्यांना मनोज तिवारी यांच्या विरोधात उभे करण्यात आले आहे. मनोज तिवारी हे प्रसिद्ध अभिनेते आहेत. शिवाय, भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवून दुसऱ्यांदा तिकीट दिलं आहे. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये दिल्लीची जनता कोणाच्या पारड्यात यश टाकते हे पाहावं लागणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group