राहुल गांधींच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांना अटक करण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन
राहुल गांधींच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांना अटक करण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन
img
चंद्रशेखर गोसावी


नाशिक -  काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांना त्वरित अटक करावी यासाठी नाशिकमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले.

दिवसेंदिवस भाजप व त्यांचे मित्र पक्षांचे नेते देशाचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करून जीवे मारण्याची धमक्या देत आहेत. भाजप व मित्र पक्षांचे नेते रोज चीथावणीखोर भाषण करून राहुल गांधी यांच्या जीवाला कसा धोका होईल याचा कट रचला जातोय की काय असे काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात संशय आहे. अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना त्वरित अटक करून त्यांची सखोल चौकशी केली पाहिजे असे उद्गार नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी काढले. 

एनएसयुआय व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन येथे निषेध आंदोलन केले त्याप्रसंगी आकाश छाजेड बोलत होते.  राहुल गांधी हे एक संविधानिक पदावर आहेत. त्यामुळे त्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या या नेत्यांना त्वरित अटक झाली पाहिजे व कडक शिक्षा झाली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे असेही छाजेड यांनी मत व्यक्त केले. 

शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड व जिल्हा एनएसयुआयचे अध्यक्ष अल्तमश शेख यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पक्ष व नेत्यांचा धिक्कार असो, राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. 

यावेळी राहुल दिवे, आशा तडवी, स्वप्निल पाटील, अल्तमश शेख, वसंत ठाकूर, संतोष ठाकूर, आप्पा गवळी, रोशन वाघ, वैभव गुंजाळ, हर्षद केंद्रे, भालचंद्र पाटील, नंदकुमार सूर्यवंशी, फारुख मन्सुरी, शहबाज मिर्झा, सॅम्युअल अवताडे, इसाक कुरेशी, अनिल बहोत, रामकिशन चव्हाण, शाहिद शेख, अब्दुल शेख, इलिया शहा, मायाताई काळे, समीना पठाण, परविन शेख, आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group