काँग्रेसमध्ये पुन्हा मोठा भूकंप, बडा नेता साथ सोडणार
काँग्रेसमध्ये पुन्हा मोठा भूकंप, बडा नेता साथ सोडणार
img
Dipali Ghadwaje
मुंबई :  ऐन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.  माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅ. ए. आर. अंतुले यांचे जावई आणि त्यांचे राजकीय वारसदार म्हणून गेली ४० वर्षे राजकारणात कार्यरत असलेले मुश्ताक अंतुले काँग्रेसला रामराम करत  अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.

माजी आमदार असलेल्या मुश्ताक अंतुले यांनी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष म्हणून यापूर्वी काम पाहिलेले आहे. अंतुले यांच्या प्रवेशामुळे रायगड मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे यांना लाभ होण्याची शक्यता आहे.

अंतुले आणि तटकरे एकमेकांचे मित्र

मुश्ताक अंतुले हे सुनील तटकरे यांचे जवळचे मित्र आहेत. तसेच त्यांनी महाराष्ट्रात प्रदूषण नियंत्रण मंडळातही महत्त्वाची जबाबदारी पार पडलेली आहे. मुश्ताक अंतले आणि सुनिल तटकरे यांचे जवळचे संबंध आहे. अनेक कार्यक्रमानिमित्त या दोन्ही नेत्यांचे एकमेकांकडे येणे-जाणे असते. असे असतानाच आता ऐन निवडणुकीच्या धामधुमीत अंतुले राष्ट्रवादीत (अजित पवार गट) जाणार असल्याचे म्हटले जात आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group