Nashik : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
Nashik : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
img
दैनिक भ्रमर
    
नाशिक : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्याची अधिसूचना उद्या (दि. 26) जाहीर होत आहे.

निवडणूक प्रक्रिया निःपक्ष, भयमुक्त व पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. प्रशासनामार्फत आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली असून लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सर्व प्रकारे सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी आज येथे दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी 20 दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्यासह अधिकारी व माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्याची अधिसूचना उद्या जाहीर होत असून, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी निवडणूक कार्यक्रमाची व निवडणूक सज्जतेची सविस्तर माहिती दिली.

असा आहे 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम

1. नामनिर्देशन पत्र दाखल करणे.
दि. 26.04.2024  ते  03.05.2024 वेळ – स.11 ते दु. 3 (सार्वजनिक सुटीचे दिवस वगळता) निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय.

2. नामनिर्देशन पत्रांची छाननी
दि. 4.5.2024  सकाळी 11 वाजेपासुन निव़डणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय

3. उमेदवारी मागे घेणे.
दि. 06.05.2024  (सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत) निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय

4. मतदानाचा दिनांक व वेळ
दि. 20.5.2024 रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपावेतो.

5. मतमोजणीचा दि. 4.6.2024 रोजी सकाळी 8 वाजेपासुन (केंद्रीय वखार महामंडळ गोदाम, अंबड, नाशिक)
 
वरील कार्यक्रमानुसार उमेदवारांनी नमुना 2-अ मध्ये नामनिर्देशनपत्र व नमुना 26 मध्ये शपथपत्र आवश्यक कागदपत्रांसह निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे विहित वेळेत सादर करणे आवश्यक आहे.

20 दिंडोरी लोकसभा मतदार संघाकरिता बाबासाहेब पारधे, अपर जिल्हाधिकारी नाशिक हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील तर 21 नाशिक लोकसभा मतदार संघाकरिता जलज शर्मा, जिल्हाधिकारी नाशिक हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील.
इतर बातम्या
Join Whatsapp Group