नाशिक :- 4 हजार रुपयांची लाच घेताना महिला अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
स्नेहल सुनिल ठाकुर (वय 52, रा. ग्रँड आश्विन हॉटेल जवळ ,ASM 26/26 आश्विन संकुल रो हाऊस नंबर 4, अश्विन नगर, नाशिक) असे लाच घेणाऱ्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांची एक कंपनी दोन वर्षापासुन बंद असल्याने तिचा व्यवसायकर रद्द व्हावा यासाठी दि. 13 सप्टेंबर रोजी व्यवसाय कर अधिकारी यांचे कार्यालयात अर्ज केला होता. हा व्यवसायकर रद्द करून द्यायच्या बदल्यात स्नेहल ठाकुर यांनी तक्रारदार यांच्याकडे 5 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती 4 हजार रुपयांची लाच घेताना त्यांना पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक विश्वजीत जाधव, पो.ह .प्रकाश डोंगरे, पो. ना. प्रणय इंगळे, म पो शि शितल सूर्यवंशी, चालक पो ह संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने केली.