सिमेंटचा ब्लॉक डोक्यात घालून एका इसमाची हत्या; नाशिक जिल्ह्यातील घटना
सिमेंटचा ब्लॉक डोक्यात घालून एका इसमाची हत्या; नाशिक जिल्ह्यातील घटना
img
दैनिक भ्रमर

मनमाड (नैवद्या बिदरी) :- एका अज्ञात इसमाने एका अनोळखी इसमाच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून त्याचा खून केल्याची घटना निदर्शनास आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

मनमाड शहर पोलीस स्थानकात याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध भादंवी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पंकज देवकाते नेमणूक मनमाड पोलीस स्थानक यांनी अज्ञात इसमा विरोधात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून एका अनोळखी इसमाच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून त्याच जीवे ठार मारले.

मनमाड येथील भारत नगर जवळील स्ट्रेस क्रेट कंपनीच्या पाठीमागे रेल्वे ट्रॅक जवळ एक अनोखी पुरुष इसम वय अंदाजे 30 ते 35 यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून त्याच्या खून केल्याचे निदर्शनास आले. शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group