बारामतीत आता विधानसभेला अजित पवारांविरोधात कोण? सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितले…
बारामतीत आता विधानसभेला अजित पवारांविरोधात कोण? सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितले…
img
Dipali Ghadwaje
बारमतीची लढाई शरद पवारांच्या राष्ट्रवादीने, सुप्रिया सुळेंनी जिंकली आहे. त्यानंतर आता प्रश्न उपस्थित होतोय की बारामतीचा आमदार कोण असणार? राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी ही लोकसभेत झालेली लढाई विधानसभेतही पाहायला मिळणार आहे, मात्र अजित पवारांच्या विरोधात शरद पवार गटाकडून कोण उमेदवार असणार याची उत्सूकता आतापासूनच वाढली आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेचा मतदार संघ बारामती ठरला होता. या निवडणुकीत पवार कुटुंबियामध्येच लढत झाली होती. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यातील लढत रंगली होती. भावजय-नणंद यांच्या या लढतीत नणंद सुप्रिया सुळे हिने बाजी मारली. त्यानंतर आता बारामती विधानसभेची चर्चा आतापासून सुरु झाली आहे. विधानसभेत काका-पुतण्यात लढत रंगणार असल्याचे बॅनर्स लागले आहेत. अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी काका-पुतण्यात लढत होणार असल्याची चर्चा आहे. त्यावर शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी प्रथमच मत व्यक्त केले आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

बारामती विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कोण उमेदवार असणार? युगेंद्र पवार यांना उमेदवारी देणार का? या प्रश्नांवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही महाविकास आघाडी म्हणून विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्या आघाडीत जागा वाटप होईल. जागा वाटपात बारामती मतदार संघावर कोण दावा करणार? कोणाचा दावा मजबूत असणार? हे ठरणार आहे. त्यानंतर बारामतीमधून कोणता पक्ष आणि कोणता उमेदवार असणार हे ठरणार आहे. बारामतीमध्ये युगेंद्र पवार उमेदवार असणार? यासंदर्भात बॅनर्स लागले. परंतु त्यासंदर्भात आपणास माहीत नाही. मी दिल्लीत होते, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.  

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group