नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये "या" उमेदवाराने पहिल्या फेरीत घेतली आघाडी
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक - नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार किशोर दराडे हे 1775 मतांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या पुढे आहेत. पहिली फेरी पूर्ण व्हायला साधारण आठ साडेआठ वाजणार आहेत. 

शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी अंबड येथील वेअर हाऊस मध्ये आज सकाळपासून सुरु झाली असून दुपारनंतर या मतांची गणना सुरू झाली. आज सकाळी आठ वाजता विभागीय आयुक्त तसा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या उपस्थितीमध्ये मतमोजणीस सुरूवात झाली.  यावेळी जिल्हाधिकारी नाशिक जलज शर्मा, जिल्हाधिकारी अहमदनगर सिद्धराम सालीमठ, जिल्हाधिकारी जळगांव, आयुषप्रसाद, जिल्हाधिकारी धुळे अभिनव गोयल, जिल्हाधिकारी नंदुरबार मनीषा खत्री, अपर आयुक्त तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश सागर, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे नाशिकचे निवडणूक उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे व विभागातील इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण ६४  हजार ८४८ मतदारांनी मतदान केले होते. मतमोजणी ३० टेबलांवर सुरू आहे. त्यापूर्वी या ठिकाणी सर्व मतपत्रिका या एकत्र करून त्याचे गठ्ठे बनविण्याचे काम करण्यात आले. यामध्ये तालुक्याच्या मतपेट्यांमध्ये एक एक मतपत्रिका जास्त सापडली तर दुसऱ्या एका तालुक्याच्या मतपेटी मध्ये तीन मतपत्रिका जास्त सापडल्या. या पाचही मतपत्रिका निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर गेडाम यांनी बाजूला काढलेल्या आहेत.

दुपारी चार वाजेच्या सुमारास प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली तीस हजार मतांची मतमोजणी सुरू झाली असून सायंकाळी सात वाजेनंतर ही मतमोजणी सुरू होती. सायंकाळी सात वाजेपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांना 11 हजार 145 अहमदनगर येथील बिपिन कोल्हे यांना 9 हजार 370 तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांना ७०८४ मत मिळाली असून पहिल्या फेरीच्या मतमोजणी मध्ये 1775 मतांनी विद्यमान आमदार किशोर दराडे हे अहमदनगर मधील अपक्ष बिपिन कोल्हे यांच्या पेक्षा पुढे आहे. या मतमोजणीची अंतिम आकडेवारी रात्री उशिरा घोषित होईल. उर्वरित 34 हजार 582 मतांची मतमोजणी ही दुसऱ्या फेरीत होणार आहे. 

या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असून उत्सुकता शिगेला पोचलेली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत व इतर पोलीस अधिकारी , कर्मचाऱ्यांचा कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
इतर बातम्या
Join Whatsapp Group