मेघदूत शॉपिंग सेंटरजवळ दुकान फोडून लाखाचे मोबाईल लंपास
मेघदूत शॉपिंग सेंटरजवळ दुकान फोडून लाखाचे मोबाईल लंपास
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- बंद दुकानाचे शटर उचकटवून अज्ञात चोरट्याने दुकानात विक्री व दुरुस्तीसाठी ठेवलेले वेगवेगळ्या कंपन्यांचे सुमारे एक लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरून नेल्याची घटना सी. बी. एस. जवळ घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी श्रीकांत सुधाकर चांदवडे (रा. तेली गल्ली, रविवार पेठ, नाशिक) यांचे सी. बी. एस. जवळ हॉटेल बसेराच्या खाली श्री साईराज मोबाईल फोन विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. काल (दि. 3) रात्री चांदवडे हे दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने या बंद दुकानाचे शटर उचकाटून दुकानात प्रवेश केला.

यावेळी दुकानात विक्री व दुरुस्तीसाठी आलेले 34 हजार 300 रुपये किमतीचे चार मोबाईल, 32 हजार रुपये किमतीचे 16 नग जुने विक्रीसाठी व दुरुस्तीसाठी आलेले वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल, तसेच 40 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 1 लाख 6 हजार 300 रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने दुकान फोडून चोरून नेला.

या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group