कसारा-कल्याण दरम्यान मुसळधार पाऊस, रेल्वे वाहतूक ठप्प; अनेक गाड्या रद्द
कसारा-कल्याण दरम्यान मुसळधार पाऊस, रेल्वे वाहतूक ठप्प; अनेक गाड्या रद्द
img
Chandrakant Barve

नाशिकरोड(भ्रमर प्रतिनिधी):- नाशिकहून मुंबईला जाताना वाशिद रेल्वे स्थानक परिसरात मुसळधार पावसामुळे रुळावर झाड पडले. त्याचबरोबर पावसाच्या जोरदार पाण्याच्या प्रवाहाने वाळूचा भराव वाहून गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक दुपारी पर्यंत ठप्प होती.

अनेक गाड्या भुसावळ, मनमाड, नाशिक रोड व देवळाली आदी स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. शहापूर भागात मुसळधार पाऊस सुरुच आहे.त्यामुळे पंचवटी रविवारी रद्द झाली तर सायंकाळ पासून वाहतूक सुरळीत झाल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले.अनेक स्थानकात प्रवाश्याची गर्दी मोठया प्रमाणत होती.

काल मनमाड-नाशिक-मुंबई पंचवटी एक्सप्रेस कसारा स्थानक सोडल्या नंतर दोन डब्यांना जोडणारे कपलिंग तुटले होते. त्यामुळे इंजिन व एसी डब्यांबसह गाडी पुढे आणि 20 डबे मागे राहिले होते. त्यामुळे पंचवटीच्या प्रवाशांना पाऊण तास उशिराने मुंबईला पोहचावे लागले होते. आज मुसळधार पावसामुळे महत्वाची पंचवटी अडकून पडली आहे. ती इगतपुरीला थांबविण्यात आली होती. नंतर ती मनमाडला परतली.

मुंबईहून नाशिकच्या दिशेने येणारी गोरखपूर पुढे रवाना करण्यात आली. काही गाड्या वसई, नंदुरबार, तसेच पुणे-दौंड-मनमाड मार्गे वळविण्यात आल्या आहेत. मुंबईला जाणारी राजधानी नाशिक रोडला थांबविण्यात आली होती. सेवाग्राम देवळाली स्थानकात उभी करण्यात आली होती. नाशिक रोड आणि देवळाली स्थानकातून रेल्वे प्रवाशांना बसची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.

मुंबई कडून मनमाडला  व मनमाड मार्गे मुंबईला जाणाऱ्या गाड्या दौंड मार्गे वळवल्याने प्रवाशांचे हाल झाले. देवळाली स्थानकातून सेवाग्राम एक्सप्रेसच्या प्रवाशांना २० खाजगी बसने मुंबईकडे पाठविण्यात आले

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार खालील गाड्या जळगाव-वसई रोड-दिवा मार्गे वळवण्यात आल्या आहेत- ११०६० छपरा – एलटीटी मुंबई एक्स्प्रेस, १२२९४ प्रयागराज -एलटीटी एक्स्प्रेस, १२७४२ पाटणा जंक्शन-वास्को-दा-गामा एक्स्प्रेस, १४३१४ बरेली जंक्शन-एलटीटी एक्स्प्रेस.

गाड्या शॉर्ट टर्मिनेटेड- २०७०५ जालना - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस , १२१५२ शालीमार-एलटीटी आणि १२११० मनमाड-मुंबई पंचवटी इगतपुरी येथे थांबविण्यात आली. ११०१२ धुळे – मुंबई नाशिकरोड येथे. १११२० भुसावळ-इगतपुरी मनमाड येथे. १२१४० नागपूर-मुंबई देवळाली येथे.

 मनमाड-दौंड-पुणे मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्या- १२१६८ बनारस – एलटीटी, १२१४२ पाटलीपुत्र- एलटीटी, १२८१२ हटिया – एलटीटी, ११०८० गोरखपूर – एलटीटी.

शॉर्ट ओरिजिनेटेड – १०७०६ मुंबई-जालना वंदे भारत  इगतपुरी येथे. १२०७१ मुंबई - हिंगोली डेक्कन जनशताब्दी एक्स्प्रेस  नाशिकरोड येथे.१२१३९ मुंबई- नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस  नाशिकरोड. रेल्वे दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर सुरु होते. पावसामुळे त्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे सोमवारी (दि.८) पंचवटी व अन्य रेल्वे गाड्या धावणार की नाही याबाबत निश्चितता नव्हती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group