नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- स्थानकातुन निघालेल्या चालत्या गाडीतून पडून रेल्वे खाली येत असलेल्या युवतीला रेल्वे सुरक्षा बल व महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव बाजीवर लावून वाचवले.
पूजा सद्गुरू गोस्वामी (वय 20) राहणार हनुमान नगर, मनमाड ही युवती आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मुबंई कडे जाणाऱ्या विदर्भ एक्सप्रेस मधून नाशिकरोड येथे येत होत्या. फलाट 3वर विदर्भ एक्सप्रेस थांबल्या नंतर तीन ते चार मिनिटांनी गाडी मुबंई कडे निघाली. गाडी चालू होताच पूजा गाडी खाली उतरू लागले.
त्यावेळी तिचा पाय सटकला आणि त्या फलाट आणि गाडी च्या मध्ये सापडल्या. त्याच वेळी फलाटावर गस्ती वर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी योगेश गवाड आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी खंडू गोलवड यांनी प्रसंगावधन राखून जीवाची बाजी लावत पूजा गोस्वामी यांना बाहेर ओढून काढले आणि त्यांचा जीव वाचवाला. त्यांच्या या धाडसाचे रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक हरफूलसिंग यादव यांनी कौतुक करीत त्यांचा सन्मान केला.
चालत्या गाडीत चढणे-उतरणे धोक्याचे आहे. हे करतांना आपला जीव जाऊ शकतो त्यामुळे प्रवासी यांनी काळजी घ्यावी असे अहवान आर,पी,एफ निरीक्षक हरफूलसिंग यादव यांनी केले आहे.