डेंग्यूसदृश अळ्या आढळल्याने मनपाची
डेंग्यूसदृश अळ्या आढळल्याने मनपाची "यांच्यावर" दंडात्मक कारवाई
img
दैनिक भ्रमर


नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शहरामध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आता महानगरपालिकेने अनेक ठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात केली असून, त्यापैकी एस. टी. महामंडळाचे गोडाऊन आणि मालपाणी इस्टेट या दोन ठिकाणी महानगरपालिकेच्या आरोग्य पथकाने छापा टाकून दंडात्मक कारवाई केली आहे.

नाशिक शहर डेंग्यूचे हॉटस्पॉट होत आहे. त्यामुळे या ठिकाणी डेंग्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही 500 च्या आसपास गेलेली आहे. ही कागदोपत्री संख्या असली, तरीही प्रत्यक्षातील संख्या जास्त असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे डेंग्यूचे प्रमाण नाशिक शहरात जास्त असल्याचे हे आता स्पष्ट झाले आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकेने कारवाई करणे अपेक्षित होते; परंतु महानगरपालिकेने अशी कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे हे प्रमाण वाढतच राहिले आहे. 

दरम्यान, नाशिक महानगरपालिकेच्या पथकाने नाशिक ते पेठ महामार्गावर असलेल्या एस. टी. महामंडळाच्या गोडाऊनवर छापा टाकला असून, या ठिकाणी डास, उत्पत्ती आणि डेंग्यूच्या अळ्या असल्याचे लक्षात आल्याने त्या ठिकाणी कारवाई केली आहे, तर हॉटेल एक्स्प्रेस इनशेजारी असलेल्या मालपाणी इस्टेट या पंचतारांकित सोसायटीच्या स्विमिंग पुलामध्येही डेंग्यूच्या अळ्या आढळल्याने तेथेही महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली आहे.

इतर बातम्या
नाशिकरोडचे

Join Whatsapp Group